CAA Full form in Marathi

मित्रांनो CAA  हा शब्द तुम्ही नक्कीच कुठेतरी वाचला असेल. पण सी.ए.ए म्हणजे काय? हे बऱ्याच जणांना माहीत नसेल.आजच्या लेखांमध्ये आपण CAA full form in Marathi मध्ये माहिती पाहणार आहे तसेच त्याचा “फुल फॉर्म” ही बघणार आहे.

CAA full form in Marathi

तर मित्रांनो सर्वात पहिले आपण  तुम्ही ज्या प्रश्नासाठी आपल्या वेबसाईटवर आलेला आहात ते पाहूयात. आणि नंतर त्याची सविस्तर माहिती बघूया.

CAA (सीएए)-  म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा. त्यालाच इंग्रजीमध्ये  (सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट) Citizenship Amendment Act  असं म्हटलं जातं.

 काय आहे? CAA

नागरिकत्व सुधारणा कायद्याची म्हणजेच सी.ए.ए ची CAAअधिसूचना 11 मार्च रोजी केंद्रीय मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. या कायद्यात अफगाणिस्तान,पाकिस्तान,बांगलादेश या देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. डिसेंबर 2019 मध्ये या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती. परंतु विरोधी पक्षांनी आणि काही विशिष्ट समुदायांनी या कायद्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. परंतु हा कायदा आता देशभरात लागू करण्यात आला आहे. अफगाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेश मधून 2014 पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, जैन इत्यादींना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. 

सी.ए.ए कायदा करण्यामागची पार्श्वभूमी

Assam मध्ये 2 कोटी नागरिकांची नावे असलेला नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (NRC) या दस्ताऐवजाचा अंतिम नमुना प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये २,८९,८३,६७७  नागरिकांची नोंद आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (NRC) अद्यावत करण्याच्या प्रक्रियेत एकूण ३,२९,९१,३८४  लोकांनी यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ४०,०७,७०७  लोकांची नावे यामध्ये नव्हती.

सी.ए.ए कायद्यानुसार, या राज्यांना नागरिकत्व मंजुरीचे अधिकार

नागरिकत्व कायदा 1955 च्या अंतर्गत बांगलादेश,पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशातून स्थलांतरित झालेल्या हिंदू, जैन, ख्रिश्चन, पारशी, शीख यांना नागरिकत्व देण्याचे अधिकार देशातील नऊ राज्यातील जिल्हाधिकारी व गृह सचिवांना देण्यात आले. त्यामध्ये हरियाणा, छत्तीसगड ,महाराष्ट्र, गुजरात ,राजस्थान मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब हे राज्य आहेत. या कायद्यानुसार भारतात 12 ऐवजी सहा वर्ष वास्तव्य केल्यानंतर 12 ऐवजी सहा वर्ष वास्तव्य केल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसली ही तरीही त्यांना भारताचे नागरिकत्व मिळते.

काय शिकायला मिळाले?

तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण CAA full form in marathi जाणून घेतला आहे.तसेच सी.ए.ए कायदा काय आहे? या कायद्याचे अधिकार काय आहेत. तसेच कोणाला या कायद्यानुसार अधिकार देण्यात आले आहेत. हे आपण जाणून घेतले आहे. आशा आहे तुमच्या मनामध्ये असलेले सी.ए.ए बद्दलचे सर्व डाउट्स क्लिअर झाले असतील. जर तुमच्या मनामध्ये अजूनही याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद 

Leave a comment