ECS Full Form in Banking Marathi : मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये ECS हे नाव तुम्ही ऐकले असेल,ज्यावेळी आपण एखादी वस्तू EMI वर घेतो. त्यावेळी आपल्या Saving अकाउंट ला ECS जोडला जातो. पण बऱ्याच जणांना ईसीएस म्हणजे काय हे माहित नाही. आज आपण ECS बद्दल माहिती पाहणार आहे. आजच्या पोस्टमध्ये ECS Full Form in Banking Marathi तसेच ECS Full Form in Marathi आणि ECS कसे काम करते, बँकिंग क्षेत्रात ECS चा काय रोल आहे हे पाहणार आहोत. चला तर मग याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात.
आपल्या बँक खात्यातून होणारी Auto Debit सेवा ही ECS मार्फत होत असते. सध्याच्या काळात ECS सेवा खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. एकदा का खात्याला ECS जोडला तर त्याच्याकडे पाहण्याची गरज लागत नाही. आपल्या खात्यातून ऑटोमॅटिक पैसे डेबिट केले जातात.
ECS Full Form in Banking Marathi
Electronic Clearance Service (इलेक्ट्रॉनिक क्लीअरन्स सर्व्हिस) तसेच मराठी भाषेत याला विद्युत क्लिअरिंग सेवा असेही म्हटले जाते.
What is ECS Meaning in Marathi ? ECS म्हणजे काय मराठीत :
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, बँकिंग क्षेत्राचा खूप मोठा रोल आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आपले सर्व व्यवहार हे बँकांमार्फत चालत असतात. आपल्याला एखाद्याला पैसे द्यायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर आपल्याकडे एखाद्या बँकेचे Saving खाते किंवा Current खाते असले पाहिजे तरच आपण ते व्यवहार करू शकतो. त्यातच बऱ्याच बँकांमध्ये आता भरपूर सुविधा आल्या आहेत. या अगोदर आपल्याला बँकेमध्ये पैसे भरायचे असतील तर बँकेत जावे लागत होते. किंवा पैसे काढायचे असतील तर बँकेत गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता. पण आता सर्व काही डिजिटल झालेले आहे. आपण घरबसल्या पैसे भरू किंवा काढू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून ECS पद्धत खूप प्रचलित आहे. आपल्याला एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्याचा एक इलेक्ट्रॉनिक पर्याय म्हणजे ECS म्हणता येईल. म्हणजे ही पद्धत ही ऑटोमॅटिक चालते. ठराविक रकमेचे व्यवहार हे ईसीएस मार्फत चालतात. या ठिकाणी आपण ही सेवा वापरत असतो.
ECS ही सेवा भारतीय रिझर्व बँकेने आपले व्यवहार जलद गतीने व सुलभ व्हावेत म्हणून सुरू केली होती. आपले आर्थिक व्यवहार हे आपल्या क्रेडिट स्कोर वर अवलंबून असतात. क्रेडिट स्कोर जास्त असेल तर कोणतीही बँक आपल्याला कर्ज देते. तसेच क्रेडिट स्कोर कमी असेल तर बँका आपल्याला कर्ज देत नाहीत. त्यामुळे क्रेडिट स्कोर जास्त प्रमाणात प्रभाव टाकत असतो. त्यामुळे आपला स्कोर हा मेंटेन राहावा आणि आपले व्यवहार सुरळीत राहावेत म्हणून ECS सेवेच्या मदतीने आपण विविध प्रकारची बिले, कर्जाचे हप्ते, म्युचल फंड इत्यादीं ऑटोमॅटिक पद्धतीने भरू शकतो.
History of ECS ( ECS चा इतिहास)
ECS ही सेवा सर्वप्रथम भारतीय डाक विभागाने 9 ऑगस्ट 2003 रोजी मुंबई येथे सुरू केली. त्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने काही काळानंतर सर्व ठिकाणी ECS ही पद्धत अवलंबली. या पद्धतीमुळे बँकांचा ताण कमी झाला. बरेच व्यवहार हे ऑटोमॅटिक पद्धतीने चालू लागले.
ECS चे बँकिंग क्षेत्रातील फायदे ( Benefits of ECS)
ECS चा महत्त्वाचा फायदा असा आहे की आपला क्रेडिट Score मेंटेन ठेवण्यासाठी. आपले जे पण काही कर्जाची हप्ते असतील विविध प्रकारची बिले असतील, म्युचल फंड असतील यांचे पैसे Automatic पद्धतीने हे तिकडे पाठवले जातात. त्यामुळे हप्ते हे बाऊन्स होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपला Score हा मेंटेन ठेवला जातो.
ECS चा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्यामार्फत ज्या काही योजना येतात योजनेचे पैसे जे येतात ते सरळ ECS मार्फत आपल्या Bank खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे भ्रष्टाचार Froud नावाची गोष्टच राहत नाही.
ECS सेवेचा फायदा हा Digital युगाच्या आधी पासूनच होतो आहे. परिणामी यामध्ये सुविधांची वाढ होत गेल्याने आपले व्यवहार जलदगतीने आणि सुलभ झाले.
How is ECS used? ECS कशा पद्धतीने वापरली जाते?
ECS वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमचे स्कॉलरशिप चे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. ते कशा पद्धतीने होतात मला माहिती आहे का. तर ते जमा होतात ECS पद्धतीने. होय, अगदी खर आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार ईसीएस पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यापर्यंत पाठवले जातात.
ECS हे आपण बँकेमध्ये जाऊन ईसीएस चा फॉर्म भरून देऊन आपल्या खात्याला संलग्न करू शकतो. त्यामुळे आपल्या खात्यामधून ठराविक तारखेला हे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये ऑटो डेबिट होऊन जातात. यामध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून यामध्ये कोणताही फ्रॉड होण्याची शक्यता नसते.
जग डिजिटल होत चालले आहे, आपल्याला सर्व काही फास्ट आणि जलद गतीने हवे असते. कर्जाचे हप्ते, म्युचल फंड, एलआयसी चे हप्ते, पॉलिसीचे हप्ते हे सर्व आपण एका क्लिकवर ECS पद्धतीने ऑटो डेबिट लावून. करू शकतो.
मी आशा करतो ECS बद्दलचे तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील. तसेच ECS Full Form in Marathi, How is ECS used? ECS कशा पद्धतीने वापरतात, History of ECS, ECS चे बँकिंग क्षेत्रातील फायदे ही माहिती आपण बघितली. यामधून तुम्हाला हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. जर तुमच्या मनामध्ये ECS बद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या मार्फत आम्हाला विचारू शकता.
लोक हेदेखील विचारतात –
What is the ECS in banking?
Answer – क्लिअरिंग हाऊसच्या सेवांचा वापर करून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरित करण्याचा हा एक प्रकार आहे.
What is ECS return charges in bank?
Answer – इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ECS) व्यवहार अयशस्वी झाल्यास प्रतेक बँकांकडून ECS charges आकारले जाते. हे खात्यातील अपुरा निधी, खाते बंद करणे, प्रदान केलेल्या खात्याच्या तपशीलातील चुकीची माहिती नुसार आकारले जाते.
ECS कर्ज आहे का?
ECS हे कर्ज नाही तर, आपण घेतलेले कर्जाचे हप्ते, म्युचल फंड्स, एलआयसी चे हप्ते, इत्यादी प्रकारचे व्यवहार हे आपल्या खात्यातून ECS मार्फत केले जातात.