IPL Full Form | IPL Full Form in Marathi

मित्रांनो आयपीएल म्हटलं की क्रिकेट प्रेमींचा जीव की प्राण. आज आपण IPL Full Form तसेच IPL बद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. क्रिकेट म्हटलं की लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण क्रिकेटचा दिवाना आहे. क्रिकेट हा बघितला तर बाहेरच्या देशातील खेळ आहे पण सर्वात जास्त क्रेज याची भारतामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान जर मॅच असेल तर काही बोलायलाच नको

मित्रांनो भारतात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि बघितला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि त्यातल्या त्यात आयपीएल IPL हे सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. या आयपीएल स्पर्धेत जगभरातून खेळाडू घेऊन आपापले खेळातले कौशल्य दाखवतात. त्यामध्ये एकूण दहा प्रकारचे सहभागी संघ होतात. आणि प्रत्येक संघ एका शहराचे प्रतिनिधित्व करत असतो.

आपण आजच्या या पोस्टमध्ये आयपीएल (IPL) बद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच आयपीएल संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संघांचे नावे तसेच त्यांचे फुल फॉर्म आपण बघणार आहोत.

IPL Full Form

मित्रांनो IPL चा फुल फॉर्म “Indian Premier League” असा होतो.

I – म्हणजे Indian
P- म्हणजे Premier
L – म्हणजे League
अशा पद्धतीने आयपीएलचे पूर्ण रूप- इंडियन प्रीमियर लीग असे होते.

आयपीएल (IPL) या स्पर्धेची स्थापना इसवी सन 2008 रोजी सुरू झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. आयपीएल या स्पर्धेला जगभरातून खूप लोकप्रियता मिळत आहे. भारतातील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ही आयपीएल आहे. तसेच बीसीसीआयचे BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेरमन व कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात.

आयपीएल ही जगातील श्रीमंत क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना मोठ्या रकमेचे मानधन दिले जाते. आयपीएल (IPL) मध्ये एकूण 10 संघ सहभागी होतात. वेगवेगळ्या शहरांचे प्रतिनिधित्व करून प्रत्येक संघ इतर संघाशी 2 वेळा खेळतो. साधारणतः IPL चे सामने मार्च ते मे या कार्यकाळात खेळले जातात. यामध्ये अंतिम सामन्याचा विजेता आयपीएल चॅम्पियन ठरतो. तसेच जाहिरातीं मधून मोठे उत्पन्न हे IPL ला मिळते.


IPL मध्ये खेळले जाणारे संघ व त्यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजेत

CSK Full Form – Chennai Super Kings ( चेन्नई सुपर किंगज

DC Full Form – Delhi Capitals (दिल्ली कॅपिटल)

KKR Full Form – Kolkata Knight Riders (कोलकाता नाईट रायडर्स)

LSG Full Form – Lucknow Super Giants (लखनऊ सुपर जायंटस)

MI Full Form – Mumbai Indians ( मुंबई इंडियन्स)

PBKS Full Form – Punjab Kings ( पंजाब किंग्ज)

RR Full Form – Rajasthan Royals (राजस्थान रॉयल्स)

RCB Full Form – Royal Challengers Bangaluru (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)

More information – IPL: Indian Premier League

मिञांनो तुम्हाला आयपीएल “IPL Full Form” आणि आयपीएल शी संबंधित माहिती या आपल्या ब्लॉग पोस्ट मधून मिळालीच असेल. जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर तुमचे मत नक्कीच कमेंट करून कळवा.

Leave a comment